शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, काँग्रेसला संपविणारेच एक दिवस संपतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:38 IST

वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत ...

वाई : ‘ज्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या चपराशाचा केंद्रीयमंत्री झाला, त्याच राज्यघटनेमुळे चायवाले पंतप्रधान झाले. मात्र, ते या घटनेबद्दल कधी बोलत नाहीत. उलट घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, ही खेदाची बाब आहे. ज्या काँग्रेसने अतुलनीय त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ती संपविण्याची भाषा करणारेच एक दिवस संपून जातील. पंडित नेहरू, महात्मा गांधी, किसन वीर यांच्या समाजवादी विचारांची माहिती आज तरुण पिढीला होणे गरजेचे आहे,’ असे उद्गार माजी केंद्र्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.वाई येथे आयोजित कार्यक्रमास डॉ. शैलेंद्र वीर संपादित क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी उद्योग राज्यमंत्री विनायक पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पतंगराव फाळके, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, कवठेचे सरपंच श्रीकांत वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिंदे पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा, सांगली जिल्हा स्वातंत्र्यवीर घडविणारी फॅक्टरी होते. प्रतीसरकार स्थापन करून इंग्रजांना आव्हान देणारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनच देशात ओळखला जातो. स्वातंत्र्याचा इतिहासही अलीकडच्या काळातील पिढी विसरायला लागली आहे. त्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे अजूनही संशोधन होणे गरजेचे आहे. आबांचे चरित्र नेहमीच नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करीत राहील. डॉ. शैलेश वीर यांनी द्वितीय आवृत्ती काढून मोठे काम केले आहे.’यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, स्वातंत्र्यसैनिक सोपानराव घोरपडे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी मनोगतात आबासाहेब वीर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. प्रास्ताविकात डॉ. शैलेंद्र वीर यांनी आबासाहेब वीर यांचा लहानपणापासूनचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडून आबांच्या जीवनशैलीबद्दल माहिती दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांतिवीर किसन वीर जीवनदर्शन’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलेंद्र वीर, अ‍ॅड. संजय खडसरे, अल्पना यादव, सुनील करडे यांनी स्वागत केले. डॉ. जितेंद्र्र वीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजया भोसले, मोहनआबा भोसले, शंकरराव पवार, डॉ. जे. बी. जमदाडे, नामदेवराव शिंदे, बापूसाहेब शिंदे, संदीप पोळ, अरुण पवार, प्रताप देशमुख, केशवराव पाडळे, विजयसिंह नायकवडी, आनंदराव लोळे, प्रदीप जायगुडे, विजया वीर आदींसह नागरिकउपस्थित होते.